भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास का झाला?www.marathihelp.com

भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा र्‍हास झाला:

भारतातील इंग्लंडला निर्यात होणार्‍या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे .परंतु इंग्लडमधून भारतात होणार्‍या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे . यात इंग्रजांचा फायदा होत असे .इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते .यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पन्नापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे .परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योग धंद्यांना टिकाऊ न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला.

अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी कापड, शाली, जरीकाम व किनखाब ह्यांना मागणी होती. परंतु इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होऊन अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ते जवळजवळ लयास गेले.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:11 ( 1 year ago) 5 Answer 6969 +22